रावेर (प्रतिनिधी) जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तालुक्यातील अवैध गौण खनिज वाहतुक करणाऱ्यांवर संबंधीत गावच्या सरपंचांनी लक्ष देऊन ते थांबविण्याचे निर्देश दिलेले आहेत. याला अखिल भारतीय सरपंच सघंटनेने विरोध करून दिलेली जबाबदारी काढून घेण्याची मागणी केली आहे. याबाबत आज तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाळू माफियांकडुन जिल्ह्यामध्ये तहसिलदार व सरकारी कर्मचारी यांचेवर जीवघेणे हल्ले झाले असुन रात्री अपरात्री त्यावर लक्ष ठेवणे सरपंचांना शक्य नाही. तसेच सदरील जबाबदारी ही पुर्ण महसुल विभागाची असुन सरपंचांना या जबाबदारीतुन यांना वगळविण्यात यावे, तसेच सरपंच हे लोक प्रतिनिधी असुन ते शासकीय कर्मचारी नाहीत. त्यामुळे अखिल भारतीय सरपंच संघटनेच्या वतीने या निर्णयाला आमचा विरोध असुन वरील आदेश पाच दिवसांच्या आज रद्द न केल्यास रावेर तहसिलदार यांचे कार्यालयासमोर दिनांक दि. ५ मार्चपासुन आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सरपंच श्रीकांत महाजन, निळकंठ चौधरी, जगदीश पाटील, स्वाती परदेशी, सुनिता सपकाळे, भावना बोरवले, शितल जोगी, कांतीलाल कोळी, भूषण येवले, कुर्बान तडवी, विजया चौधरी, निळकंठ चौधरी, भास्कर चौधरी, गणेश महाजन, प्रवीण पाटील, मोहन बोरसे, कविता बगाडे, धनराज तायडे यांच्यासह तालुक्यातील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.