माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांना वाळू व्यवसायिकाची फोनवरून धमकी

जळगाव प्रतिनिधी । वाळू व्यवसायाशी संबंधित असलेल्या व्यक्तीने शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांना फोनवरून धमकी दिली. याप्रकरणी गुप्ता यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात अदखपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत माहिती अशी की, दीपककुमार प्यारेलाल गुप्ता (वय-४५) रा. शिवाजी नगर हे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत. १७ मार्च रोजी गुप्ता यांनी वाळू व्यवसायिक राजेश रोहितलाल मिश्रा रा. शाहुनगर यांच्या विरोधात अवैध वाळूची वाहतूक करतात अशी तक्रार संबंधित अधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार मिश्रा यांच्या चिंचोली येथील शेताच्या उताऱ्यावर जिल्हाधिकारी यांनी १ कोटी, ७४ लाख ८६ हजार ३२५ रूपयांचा बोजा लावला होता. याचा रोहितलाल मिश्रा यांना राग आल्याने दीपक कुमार यांच्याशी १७ मार्च  रेाजी रात्री ११ वाजेच्या सुमारास मोबाईलवर संपर्क साधून तुला खोट्या केसेसमध्ये फसवून टाकेल अशी धमकी दिली. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्या तक्रारी वरून मिश्रा यांच्याविरूध्द शहर पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Protected Content