समझोता एक्सप्रेस स्फोटातील चार आरोपी निर्दोष

court

court

पंचकुला वृत्तसंस्था । समझोता एक्सप्रेसमधील बाँब स्फोटाच्या प्रकरणामध्ये असीमानंदसह चार आरोपींची आज एनआयएच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

दिल्ली-लाहोर दरम्यान धावणार्‍या समझोता एक्स्प्रेसमध्ये १८ फेब्रुवारी २००७ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात ६८ जणांचा मृत्यू तर ५० जण जखमी झाले होते. जून २०११ मध्ये एनआयएने याप्रकरणी सुनील जोशी, नाबाकुमार सरकार उर्फ असीमानंद, लोकेश शर्मा, कमल चौहान, राजिंदर चौधरी, रामचंद्र कालसंग्रा, संदीप डांगे, अमित अशा आठ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. यातील सुनील जोशी याची डिसेंबर २००७ मध्ये हत्या झाली होती तर कालसंग्रा, डांगे, अमित हे तिघे जण अद्याप फरार आहेत. असीमानंद हे आधीच जामिनावर सुटलेले होते तर शर्मा, चौहान आणि चौधरी हे तिघे न्यायालयीन कोठडीत होते. या चारही जणांना आज कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.

Add Comment

Protected Content