जळगाव (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील सामरोद-मोयखेडा येथे असलेल्या पाणवठ्याजवळ १९ नीलगायी व १० रानडुकरांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वन्यजीव प्राण्याचा मृत्यू झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे.
घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पंचनामा केला असून पाणवठात विष टाकल्यामुळे विष बाधा होऊन या वन्यजीवांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी यांनी वर्तवला आहे. या बाबत वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील या बाबत चौकशी करत आहेत. परिसरात वन्यजीवांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अज्ञात शेतकऱ्याने या पाणवठात विष कलावल्याचा अंदाज ही वर्तवला जातोय. मात्र अशा वन्यजीवांच्या दुर्दैवी मृत्यू मुळे वन्यजीवप्रेमीमध्ये संताप व्यक्त केला जातोय.