समलैंगिक संबधातून ‘त्या’ तरूणाचा खून; मारेकऱ्यानेही घेतली फाशी

jamnern news

जामनेर, प्रतिनिधी । येथील भुसावळरोडवरील नवीन औद्योगिक वसाहतीत टेकडीच्या दरीमध्ये काल शहरातील बजरंगपुरा भागातील रहिवासी संजय चव्हाण (वय-३०) यांचा समलैंगिक संबंधातून खून करणाऱ्या मारेकरी पसार झाला होता. मात्र मारेकरीने त्याच टेकडीवर एका झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले.  टेकडीवर जामनेर पुरा भागातील रहिवासी संध्याकाळी फिरण्यासाठी जात असतात. त्या नागरीकांना संजयचा मृतदेह दिसला. झालेल्या घटनेची माहिती शहरात पसरल्याने एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, उपनिरीक्षक विकास पाटील आपल्या सहकाऱ्यांसह घटना स्थळी दाखल झाले. प्रथम तपासावेळी मयत संजय चव्हाण व तालुक्यातील सामरोद येथील मुळचे राहणारे जामनेर आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेले पुंडलिक शामराव पाटील यांचे समलैंगिक संबंध होते. अशी प्राथमिक माहिती समजली. त्यावरून संशयाची सुई वाहक पुंडलिक पाटीलकडे होती. म्हणून पाटील यांचा शोध घेतला मिळून आले नाही. दरम्यान संजयचा मृतदेह पंचनामा करून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला. त्यानंतर आज सकाळी जामनेर पोलिस पथक घटनास्थळी तपासासाठी गेले. परत गेले असता कालच्या घटनास्थळापासून काही अंतरावरच पळसच्या एका झाडाला वाहक पुडलिंक पाटीलचा मृतदेह लटकलेला आढळून आला. त्यावरून मयत संजयचा विटेने ठेचून खुन करून वाहक पाटील यांनी बदनामीच्या भितीने स्वतः ही गळफास घेत आत्महत्या केल्याचे प्रथम तपासात दिसून येत आहे. मयत संजयच्या पश्चात आई व ४ बहिणी असून तो घरातील कमविता होता. संजयच्या अशा एकाकी जाण्याने त्यांच्या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या आईने हंबरडा फोडला.

मयत संजय चव्हाण व वाहक पुंडलिक पाटील यांच्या समलैंगिक संबधांची कुणकुण शहरात अनेक जणांना अगोदरच होती. हे घटनास्थळाच्या चर्चेवरून कळते. कारण बरेचदा वाहक पाटील शेवटची ड्युटी करून आल्यावरही संजय हा वाट बघत असल्याचे कळते. तसेच मयत संजय हा वाहक पाटील यास पैशाची मागणी करत होता व त्यातून पाटील यांनी हे कृत्य केले असू शकते. नंतर आपली समाज जिवनात जगताना बदनामी होईल या भितीपोटी संजयला मारल्यावर काही अंतरावरच पुंडलिक पाटीलने झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. पुंडलिक पाटीलने संजयचा खुन केल्यानंतर जवळच्या आश्रमात जावून कुटीवरच्या हौदावर पाणी पिले व आश्रमातील एका जणास ड्युटी वरचे कपडे रक्ताने भरले असल्याने संशय येवू नये म्हणून आमच्या गाडीचा रोडवर अपघात झाला असून. सामान बाधूंन न्यायचे आहे असे सांगून दोरीची मागणी केली. असे दोरी दिलेल्या व्यक्तीने सांगितले.

आश्रमाच्या सीसीटिव्हीत मारेकरी कैद
आश्रमातील सीसीटिव्ही कँमेरातही मारेकरी पुंडलिक पाटील येवून गेल्याचे कैद झाले आहे. घटनेच्या तपासासाठी फॉरेन्सिक लँब पथकाने भेट देवून आवश्यक ते पुरावे गोळा केले. यावेळी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश काळे, पोलिस.उप निरीक्षक विकास पाटील, सुनील राठोड, सुनील माळी, किशोर पाटील, राहुल पाटील, सचिन गोसावी, किशोर परदेशी आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होते. जामनेर पोलीस स्टेशनमध्ये मयत आरोपी पुंडलिक शामराव पाटील विरोधात रमेश शामराव चव्हाण यांच्या फिर्यादीवरून कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, तसेच गळफास घेत आत्महत्या केल्याबाबत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश काळे करत आहे.

Protected Content