जळगाव प्रतिनिधी । स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीतर्फे मंगळवारी छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्ताने दीक्षितवाडीतील फिटनेस प्लॅनेट जीम येथे सकाळी ८ वाजता रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते. तसेच खान्देश सेंट्रल येथून सायंकाळी ५ वाजता छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्ताने मिरवणूक देखील काढण्यात आली.
अयोध्यानगरात अभिवादन
स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त अयोध्या नगर येथील हनुमान मंदिराजवळ सकाळी १० वाजेला जितु चौथे मित्र परिवारातर्फे व छ.संभाजी महाराज मराठा युवा मंचच्या वतीने प्रतिमापुजन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता यूवा मोर्चा सरचिटणीस जितु चौथे, जि.प सदस्य रवी भाऊ देशमुख, अ.भा.छावा संघटनेचे विभागीय अध्यक्ष नंदु पाटिल, नगरसेविका रंजनाताई वानखेडे, नगरसेविका मिनाक्षीताई पाटील, नगरसेविक सुनिल खडके, माजी नगरसेवक प्रदिप रोटे, उद्योजक विजय वानखेडे, जिल्हा वकील संघाचे जिल्हाध्यक्ष अँड. सचिन पाटिल, ईश्वर चौधरी, विठ्ठल पाटील, चेतन निंबाळकर, निलेश पाटील, कुणाल पाटील, केतन पाटील, मनोज मोहीते, लोकेश मराठे, शुभम मराठे, देवेंद्र मराठे, विशाल भादले, चेतन चौधरी, तसेच भा.ज.युवा मोर्चा अयोध्यानगर परीसर अध्यक्ष अक्षय जेजुरकर, मराठे मित्र परिवार रामेश्र्वर काँलनी, MSEB मित्र परिवार, राम मंदिर अयोध्या नगर मित्र परिवार, लोकसेवा फाऊंडेशन मित्र परिवार, सर्व पदाधिकारी,सकल मराठा समाज पदाधिकारी व सर्व मित्र परिवार उपस्थित होते.