Home धर्म-समाज छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या नियोजनाबाबत चर्चा

छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या नियोजनाबाबत चर्चा

0
78

पाचोरा प्रतिनिधी । येथील छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि चौकाच्या सुशोभीकरणाबाबत आमदार किशोर पाटील यांच्या सोबत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांनी चर्चा केली.

१४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच भडगावरोड वरील राजे छत्रपती संभाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण, स्थळाचे लोकार्पण तसेच या परिसरात विविध सुधारणांच्या संदर्भात आमदार किशोर पाटील व मुकुंद बिल्दीकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांसोबत चर्चा केली. संघटनेच्या मागणी नुसार आवश्यक बदल व कार्यक्रम घेण्यात येतील असा शब्द आमदार पाटील यांनी दिली.

यावेळी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, तालुकाध्यक्ष जीभाऊ पाटील,शहराध्यक्ष रवी देवरे, कार्याध्यक्ष मुकेश तुपे, जिल्हा सल्लागार आबा सूर्यवंशी, भूषण देशमुख, प्रवीण पाटील,राहुल पाटील, स्वीय सहाय्यक राजेश पाटील उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound