धरणगाव (प्रतिनिधी) येथील येथील शासकीय विश्रामगृहात संभाजी ब्रिगेडच्या वतीने सर्वपक्षीय तुकाराम महाराज जयंती नुकतीच मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी ,भाजपा गटनेते कैलास माळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, भानुदास विसावे, राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम यावेळी तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. तर काही मान्यवरांनी तुकाराम महाराज यांच्या विचारांचा समाजावर किती खोलवर परिणाम आहे,याबाबत आपले विचार मांडले. यावेळी नगरसेवक भागवत चौधरी, पाटील समाजाचे अध्यक्ष भिमराज पाटील ,दिलीप पाटील, आर. डी. महाजन, मार्केट कमिटीचे माजी सभापती पुनीलाल महाजन, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष हेमंत चौधरी,माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, भाजपचे तालुका अध्यक्ष संजय महाजन ,काँग्रेस शहरअध्यक्ष राजेंद्र न्हाळदे, काँग्रेसचे तालुकाउपाध्यक्ष चंदन पाटील,शिरीष बयस,परेश जाधव ,रवी महाजन ,गुलाब मराठी ,नगराध्यक्ष पी. एम. पाटील,योगेश वाघ, आनंद पाटील,सुनील चौधरी,कल्पेश महाजन,सचिन पाटील, अॅड. संदीप पाटील,बंटी पवार, किरण वराडे,डॉ. बोरसे, विलास महाजन, नितीन महाजन, समाधान पाटील, योगेश मराठे, गौरव पाटील, प्रशांत देशमुख, ललित पाटील, रविंद्र मराठे ,रवी पाटील,गौतम गजरे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गोपाल पाटील,शहराध्य त्र्यंबक पाटील ,राहुल पवार,शहर कार्याध्यक्ष राकेश पाटील, यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.