पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात १ ऑगस्ट रोजी समता सैनिक दलातर्फे महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या फलकास जोडे मारत तीव्र निषेध नोंदवत संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा. अशा आषयाचे निवेदन समता सैनिक दल, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व श्री. क्षत्रिय फुल माळी समाजातर्फे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना निवेदन देण्यात आले आहे.
याप्रसंगी समता सैनिक दलाचे जिल्हा प्रचारक किशोर डोंगरे, सुनिल शिंदे, खलील देशमुख, वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगिता साळुंखे, तालुका अध्यक्ष विशाल बागुल, महासचिव दिपक परदेशी, सुनिल कदम, मा. नगरसेवक अशोक मोरे, अजहर खान, अॅड. अविनाश भालेराव, खंडु सोनवणे, आकाश अहिरे, मनोहर जमदाडे, आकाश नन्नवरे, दिपक राजपुत, कपिल पाटील, विनोद सोनार, राहुल साठे, दिपक सोनवणे, चिंधु मोकळ, कन्हैया महाजन, ज्ञानेश्वर महाजन, संतोष महाजन, अतुल महाजन यांचेसह समता सैनिक दल, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व श्री. क्षत्रिय फुल माळी समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षापासून व आता सुध्दा महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था / युवकांची जातीय विषयांवर माथी भडकविणे, देशातील व महाराष्ट्रातील समाज सुधारक व महापुरूषांबद्दल आक्षेपर्ह वक्तव्य करणे, हिंदू-मुस्लिम समाजातील महापुरूषाबद्दल वादग्रस्त व अपमानजनक वक्तव्य करीत व त्यांची विटंबना करण्याच्या हेतूने हिंदु-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत व बहुजन प्रतीपालक राजे छत्रपती शिवाजी महाराज व समाज रक्षक छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्या चुकीच्या इतिहासाची मांडणी करून आता सध्या महाराष्ट्रात सामाजिक व जातीय असंतोष निर्माण करण्याच्या हेतूने थोर समाज सुधारक राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले, उत्तर प्रदेश मधील भारतप्रसाद मिश्रा, बंगाल प्रांतातील राजाराम मोहनराय, तामिळनाडू राज्यातील रामास्वामीनायर (पेरीय्यार), राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच हिंदू – मुस्लिम समाजाचे श्रध्दास्थान साईबाबा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यातील सामाजातील बांधलिकी तोडण्याच्या उद्देशाने तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा व जातीय दंगली घडविण्याचा कट कारस्थान करण्याच्या हेतूने वक्तव्य करून समाजात असंतोष निर्माण केलेला आहे.
यासंदर्भात महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचे आंदोलन व निषेध नोंदविला जात असून भारतीय दंड संहितेनुसार या समाज कंटकावर प्रक्षोभक भाषण करणे व राष्ट्रीय महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे म्हणून कलम १५३ (अ) अंतर्गत भिडे यांच्या वर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला असून या संदर्भात आजपावेतो कुठलीही सक्त कार्यवाही झालेली नसल्याने ते वारंवार सामाजिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करित आहेत, तरी महोदय त्यांना तात्काळ अटक व्हावी. अटक न झाल्यास समता सैनिक दलाच्यावतीने संपुर्ण जिल्हा व महाराष्ट्र राज्याभर तीव्र निषेध नोंदविण्यात येईल व पुढील होणाऱ्या परिणामास पोलीस प्रशासन व महाराष्ट्र सरकार जबाबदार राहील अशा आषयाचे निवेदन पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना देण्यात आले.