पुणे (वृत्तसंस्था) कोरेगाव भीमामध्ये एक जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेसह 163 आरोपींना पुण्यात चार दिवसांची जिल्हाबंदी करण्यात आली आहे.
कोरेगाव भीमामध्ये उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी 2018 मध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्या सर्वांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार एकबोटे आणि भिंडेंसह एकूण 163 आरोपींना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. या दिवशी सर्व राजकीय आणि सामाजिक संघटनांना कोरेगाव भीमामध्ये सभा घेण्यास परवानगी देण्याचे ठरवण्यात आले आहे.