मंडे टू मंडे न्यूज नेटवर्कचे संपादक भानुदास भारंबे यांना समाज रत्न पुरस्कार

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फैजपूर येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित फैजपूर परिसर पत्रकार संघातर्फे सावद्याचे माजी नगरसेवक तथा मंडे टू मंडे न्युज नेटवर्कचे मुख्य संपादक, जेष्ठ पत्रकार भानुदास भारंबे यांच्या राजकीय, सामाजिक व पत्रकारिता शेत्रातील कार्याची दखल घेत त्यांना मान्यवरांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार प्रदान करत सन्मानित करण्यात आले.

फैजपूर परिसर पत्रकार संघातर्फे समाजात वेगवेगळ्या श्रेत्रात काम करणाऱ्या गुणवतांना पत्रकार संघातर्फे समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला, यावेळी सावद्याचे माजी नगरसेवक तथा मंडे टू मंडे न्युज नेटवर्क चे मुख्य संपादक, जेष्ठ पत्रकार भानुदास भारंबे यांच्या राजकीय, सामाजिक व पत्रकारिता शेत्रातील कार्याची दखल घेत त्यांची समाजरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. त्यानुसार आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात प्रदान करत सन्मानित करण्यात आले.

भानुदास भारंबे यांनी आपल्या ३८ वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय व पत्रकारितेच्या कार्यकाळात विविध प्रश्नांना वाचा फोडून बातम्या प्रकाशित करून जनसामान्यांना न्याय मिळवून दिला आहे. सामाजिक पत्रकारितेसोबतच विकास व शोध पत्रकारितेत त्यांनी जिल्ह्यातील प्रश्नांना वाचा फोडली आहे. याच कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आल्याचे संघाचे अध्यक्ष सलिम पिंजारी, उपाध्यक्ष राजू तडवी व आदी सदस्य यांनी सांगितले. भानुदास भारंबे यांना मिळालेल्या या समाजरत्न पुरस्काराने त्यांचे सर्व स्थरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून अभिनंदन केले जात आहे.

Protected Content