एरंडोल प्रतिनिधी । भारतीय सैन्यदलात १७ वर्ष प्रदिर्घ सेवा करुन समाधन पाटील सेवानिवृत्त झाले. घराची आर्थिक परिस्थिती चांगली असतांना सुध्दा लहानपणीच काकां कडून प्रेरणा घेऊन व देशसेवा करण्याची जिद्द बाळगून समाधान पाटील हे २००४ साली सैन्य दलात दाखल झाले.
हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर सह देशातील अनेक भागात सेवा बजावून देशाची १७ वर्ष सेवा केली. शेवटी सिक्किम चायना तसेच भूतान बॉर्डरवर सेवेत असतांना सेवानिवृत्त झाले. जवान समाधान पाटील हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील होते. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,नगराध्यक्ष रमेश परदेशी, माजी उपनगराध्यक्ष शालिक गायकवाड, उपनगराध्यक्ष अभिजीत पाटील, नगरसेवक योगेश महाजन, सामाजिक कार्यकर्ते आनंदा चौधरी, राजेंद्र महाजन, अनुदानित आश्रमशाळा बोरगावचे चेअरमन विलास सोनवणे, मुख्याध्यापक ठाकरे, तुळशिराम पाटील, जिजाबाई पाटील मान्यवर उपस्थित होते.