तांबोळे येथे शहीद जवान अरुण जाधव यांना मानवंदना

a569d1a6 2ce6 45b1 8a23 24d4b3557f7a

 

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील तांबोळे येथील शहीद वीर जवान अरुण जाधव यांना शहीद दिनानिमित्त रविवारी मानवंदना देण्यात आली. यावेळी खानदेश रक्षक ग्रुपतर्फे गावातून जाधव यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती.

 

खानदेश रक्षक ग्रुपतर्फे गावातून जाधव यांच्या प्रतिमेची काढण्यात आलेल्या मिरवणूकीची मराठी शाळा जवळील शहीद वीर जवान अरुण जाधव यांच्या पुतळ्याजवळ सांगता करण्यात आली. यावेळी सैन्यातून सुटीवर आलेले जवान खानदेश रक्षक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील, सचिव समाधान सूर्यवंशी,प्रविण पाटील,प्रविण महाजन,सोरनसिंग परदेशी, समाधान महाजन,जालींधर चित्ते, अभिमन्यू जाधव,प्रशांत चव्हाण, विनोद मांडोळे, शरद पाटील, राहुल रावते, मनोहर महाले या जवानांनी शहीद वीर जवान अरुण जाधव यांच्या पुतळ्याजवळ सैनिकी मानवंदना देवून पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी चाळीसगाव तालुका वृत्तपत्रकार मित्र मंडळाचे अध्यक्ष आर.डी.चौधरी,तांबोळे ग्रामपंचायत सरपंच डिगाबंर कुमावत,यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जाधव यांच्या कुटुंबासह हिरापूर,गणेशपूर,खडकी पिंपरी या परीसरातील जनतेसह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Add Comment

Protected Content