भुसावळ प्रतिनिधी । भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी आपल्या कोरोनाच्या उपचारात जाणवलेल्या तुटवड्याची दखल घेत ट्रॉमा केअर सेंटरला सलाईनची भेट देऊन आपल्या पक्षाचा वर्धापन दिन अनोख्या पध्दतीत साजरा केला.
भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ. नि. तु. पाटील यांच्यावर अलीकडेच ग्रामीण रूग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात आले. ते येथे उपचार घेत असतांना इंजेक्शन रेमडीसिव्हर अथवा अँटिबायोटिक अथवा स्टिरॉइड्स आदी देतांना ते ५०० मिलीलीटरच्या सलाईनने देतांना भरपूर वेळ लागत असे. शिवाय रुग्णांना हात सतत एकाच ठिकाणी ठेवावा लागे यामुळे इतर रुग्णांना उपचारासाठी विलंब होत असे.त्यावर उपाय म्हणून तेथिक स्टाफ वर्ग ५०० मिलीलिटरची बॉटल ही ३०० मिलीपर्यंत खाली करायचे. आणि मग त्याद्वारे इंजेक्शन द्यायचे, पण यात पण वेळ जात असे शिवाय औषध वाया जात असे. सरकारी रुग्णालयात१०० मिलीलीटरचा स्टॉक नसल्याने हा सर्व प्रकार होत असे.
या पार्श्वभूमिवा, आज डॉ. नि. तु. पाटील यांनी आपल्या ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानतर्फे जवळपास १५०० संख्या असलेले १०० मिलीलीटरच्या सलाईन बॉटल भुसावळ ग्रामीण रुग्णालय आणी ट्रुमा केअर सेन्टर ला भेट दिल्यात.यामुळेच नक्कीच आता स्टाफ आणि रुग्णांचा पण वेळ वाचेल,आणि उपचार लवकर होतील.कारण दिवसाला ५० रुग्णांना ३ वेळेस डोस द्यायचे म्हटले म्हणजे वेळ लागणारच, पण आता तो कमी होईल. ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना योग्य ती सेवा मिळावी,म्हणून आपण कटिबद्ध आहे,त्याचाच एक भाग म्हणून आज सलाईन भेट देण्यात आल्या अशी प्रतिक्रिया डॉ. नि. तु. पाटील यांनी व्यक्त केली आहे.
ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान भुसावळ तर्फे आणि आज भारतीय जनता पार्टीच्या ४१ व्या वर्धापनदिनाचे महत्त्व साधत १०० मिलीलीटरच्या बॉटल भुसावळ ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेन्टर ला भेट देण्यात आले. यावेळी भाजप वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नितु पाटील,मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. मयूर नितीन चौधरी, डॉ. विक्रांत सोनार, डॉ. भालचंद्र चाकूरकर, डॉ. शुभांगी पाटील,डॉ. निखिल चौधरी एलियास शेख आदी उपस्थित होते.
डॉ. नि. तु. पाटील हे सातत्याने अभिनव उपक्रम राबवत असतात. या अनुषंगाने त्यांनी भाजपच्या वर्धापन दिनाचे औचीत्य साधून राबविलेला हा उपक्रम कौतुकाचा विषय बनला आहे.