जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बनावट पास बनवून विद्यार्थ्यांना विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.
या संदर्भात विश्वसनिय सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, “शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट येथील एका दुकानातून शालेय विद्यार्थ्यांसाठी बनावट पास विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार आज उघड झाला आहे. नशिराबाद -बेळी मार्गावरील वरील बस वाहक हे विद्यार्थ्यांची पास तपासत असतांना बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी अधिक चौकशी केली असता पास बाबत कोणतीही नोंद नसल्याचे निष्पन्न झाले.
या संदर्भात संबंधीत विद्यार्थ्याची कसून चौकशी केली असता त्याने हा पास विकत घेतल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट परिसरातील एका दुकानातून हे बनावट पास तयार करून विद्यार्थ्यांना विक्री केली जात असल्याचा धक्कादायक माहिती समोर आली. त्यानुसार वाहकाने जिल्हापेठ पोलीसात धाव घेतली आहे. याबाबत पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.”
या प्रकाराने खळबळ उडाली असून यात मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.