जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी पहिल्याच दिवशी दुपारी १ वाजेपर्यंत तब्बल ३० उमेदवारी अर्ज इच्छुक उमेदवारांनी घेतले आहेत.
या संदर्भात अधिक असे की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज विक्री सुरु झाली आहे. जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी पहिल्याच दिवशी दुपारी १ वाजेपर्यंत तब्बल ३० उमेदवारी अर्ज इच्छुक उमेदवारांनी घेतले. त्यात शैलेंद्र शिवाजी पाटील (१),परवेन खान सरदार खान (कॉंग्रेस २,अपक्ष२) , सुरेंद्र उल्हास कोल्हे (कॉंग्रेस १, अपक्ष १) , गणेश कौतिकराव ढगे (अपक्ष २), मो.उजेफ मो.फारुख (रिपाई २), ललित गौरीशंकर शर्मा (अपक्ष २), नामदेव रघुनाथ कोळी (अपक्ष २), अर्जुन रामकृष्ण भारुळे (अपक्ष २),गोळूक रमेश चव्हाण (कॉंग्रेस २), विष्णू गणपत घोडेस्वार (कॉंग्रेस २), दीपक युवराज जाधव (अप्स्कः २), प्रा.डॉ.आशिष सुभाष जाधव (आप २), गौरव दामोदर सुरवाडे (अपक्ष २), सुनील सुपडू महाजन (शिवसेना २) अशांनी अर्ज विकत घेतले आहेत.