Home क्राईम वडनगरी येथे सालदाराने केला शेतमालकाचा खून

वडनगरी येथे सालदाराने केला शेतमालकाचा खून


asd

जळगाव प्रतिनिधी । कामाच्या किरकोळ वादावरून सालदाराने दारूच्या नशेत शेतमालकाच्या डोक्यात पाटा मारून खून केल्याची घटना आज तालुक्यातील वडनगरी-खेडी रस्त्यावर घडली. या खूनामुळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तालुका पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील वडनगरी येथील शेतकरी प्रभाकर शंकर पाटील (वय ७०) यांच्याकडे आरोपी सालदार सुशीलाल उर्फ शांताराम बाबुराव पावरा (वय २५) रा. शिरपूर हा सालदार म्हणून काम करीत होता. सोमवारी मध्यरात्री 12 ते पहाटे 4 वाजेच्या दरम्यान आरोपी सालदार शांताराम पावरा याने दारूच्या नशेत शेतमालक प्रभाकर पाटील यांच्या डोक्यात पाटा मारून खून केला. खून करताच तेथून त्याने पळ काढला. सकाळी मयत शेतमालक शांताराम पाटील यांचा नातू शशिकांत पाटील यांच्या लक्षात आल्याने प्रकार उघडकी आला.

पोलीसांची घटनास्थळी धाव
तालुका पोलीस स्थानकाने पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, एपीआय गणेश चव्हाण, पोना जितेंद्र पाटील, उमेश भांडारकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पोलिसांनी आरोपीचा साला आणि पत्नी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound