अमळनेर प्रतिनिधी । येथील संत सखाराम महाराज समाधी द्विशताब्दी महोत्सवाचा समारोप काल्याच्या कीर्तनाने झाला.
सोमवारी सकाळी संत सखाराम महाराज बावन्नी व महा विष्णू महाराज सहस्र नामाचा कार्यक्रम झाला. यानंतर संत तुकाराम महाराज गाथा दिंडी काढण्यात आली. यात पाच हजार भाविकांनी संत तुकाराम महाराज गाथा डोक्यावर घेऊन दिंडीत सहभाग घेतला होता. यानंतर श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या काल्याच्या किर्तनाने हा समारोह संपन्न झाला. संत प्रसाद महाराजांनी स्वतः दहीहंडी फोडून काल्याचा प्रसाद केला. दही आणि लाह्या यांचे उपस्थित भाविकांना वितरण करण्यात आले. सुमारे १५ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.