साकेगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी । येथील दाम्पत्याने आपल्या चिमुकलीसह रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली होती. यातील तिघा मृतांच्या पार्थिवावर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत वृत्त असे की, साकेगाव येथील रहिवासी हरीश शिरीष चौधरी यांनी आपली पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलीसह रेल्वेखाली आत्महत्येचा प्रयत्न केला. यात त्यांची पत्नी जयश्री आणि मुलगी गुंजन हे जागीच ठार झाले होते. तर हरीश चौधरी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतांना त्यांनी देखील शेवटचा श्वास घेतला.
दरम्यान, दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. दुपारी तिन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर तिघांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.