साकेगाव विविध कार्यकारी विकास सोसायटीवर पुन्हा राष्ट्रवादीचे वर्चस्व

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील साकेगाव येथे आज झालेल्या साकेगाव विविध कार्यकारी विकास सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय पाटील यांची निवड करण्यात आली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एच.डी.ओचीत सहकार अधिकारी होते  नवनिर्वाचित चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला तसेच जोगलखेडा येथिल राजेंद्र बाबुराव पाटिल यांची सदस्य म्हणुन निवड करण्यात आली. यावेळी सत्कार करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, माजी उपसरपंच शकील पटेल, माजी चेअरमन निवृत्ती पवार, माजी चेअरमन बाबूलाल भोई, माजी चेअरमन किशोर भोई, विकास सोसायटीचे सदस्य संतोष पाटील, शालिनीबाई पवार, इंदुबाई पवार, राजेंद्र पाटील, व्हा.चेअरमन अर्जुन उपासे यांच्यासह विकास सोसायटी सचिव सुभाष पाटील, अनिल पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पवार, गोविंदा पाटील, नरेंद्र पाटील, प्रमोद पाटील, गणेश पाटील, तुषार हडप, अमोल मांडे तसेच विकास सोसायटीचे सर्व कर्मचारी आदी मंडळी उपस्थित होते.

 

Protected Content