यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील साकळी येथे जिल्हा परिसदचे आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती रविंद्र पाटील यांच्या हस्ते साकळीच्या जिल्हा परिषद शाळेत लहान बालकाला पल्स पोलीओ डोस देण्यात येत आहे.
साकळी तालुका यावल येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम-२०२२ अंतर्गत साकळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडून दि.२७ फेब्रुवारी २०२२ रोजी गावात तीन ठिकाणी बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. साकळी गावात या मोहिमेचा शुभारंभ जळगाव जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र सूर्यभान पाटील यांच्या हस्ते जि.प.मराठी शाळेतील पोलिओ बूथवर करण्यात आला, राष्ट्रीय पल्स पोलीओ मोहीमेत जिल्ह्यातील नागरीक पाल्यांनी आपला सहभाग नोंदवुन ०ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पत्सपोलीओचे डोस बुथवर जावुन पाजुन घेणे असे आवाहन आरोग्य सभापती रविन्द्र पाटील यांनी केले आहे.
सदर पल्स पोलिओची मोहीम गावात यशस्वीपणे राबविण्यासाठी यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनिषा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती कवडीवाले यांच्या सर्व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी परिश्रम घेतले असुन या राष्ट्रीय पत्सपोलीओ मोहीमेस साकळी व परिसरातुन पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे .