पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अंतरावली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठींबा देण्यासाठी पाचोरा येथील सकल मराठा समाजातर्फे आज ३१ आक्टोबर रोजी अत्यावश्यक सेवा वगळता संपुर्ण शहर कडकडीत बंद पाडण्यात येणार आहे.
शहरातील सकल मराठा समाजातील सर्व समाज बांधवांची बैठक ३० ऑक्टोबर रोजी हुतात्मा स्मारकात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठींबा देण्यासाठी व निर्दयी सरकारच्या निषेधार्थ ३१ आक्टोबर मंगळवार रोजी सकाळी ८ वाजेपासून पाचोरा शहर एक दिवस कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकी प्रसंगी सुनिल पाटील, विकास पाटील, खलील देशमुख, धनराज पाटील, एस. ए. पाटील, हरिभाऊ पाटील, संजय पाटील, किशोर बारावकर, अजहर खान, प्रविण पाटील, जिभाऊ पाटील, मुकेश तुपे, एस. के. पाटील, सचिन पाटील, निलेश पाटील, रणजीत पाटील, सागर पाटील, पवन पाटील, दिपक मुळे यांचेसह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, पाचोरा शहरातील व्यापारी व सर्व नागरिकांनी या बंदमध्ये सहभागी होउन बंद यशस्वी करण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.