जळगाव प्रतिनिधी । येथील सकल मराठा समाज व विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमानाने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
जळगाव जिल्हा सकल मराठा समाज,(मराठा सेवा संघ,मराठा महासंघ, छावा संघटना मराठा सेवा संघ,संभाजी बिग्रेड, बुलंद छावा ,जिजाऊ बिग्रेड व राजे प्रतिष्ठान,शिवाजी बिग्रेड) सयुंक्त विद्यमाने १० वी १२ वी महाविद्यालयातील विध्यार्थी व क्रीडा सामाजिक क्षेत्रातील स्पर्धा परीक्षेतील यशवंतचा गौरव सोहळा पार पडला. याच कार्यक्रमात विविध मान्यवरांना गौरविण्यात आले. मायादेवीनगर रोटरी हॉल मध्ये आमदार सौ.स्मिताताई वाघ अध्यक्षेतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी डॉ.नीलकंठ गायकवाड,जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील आदिवासी प्रकल्प अधिकारी विनिता सोनावणे, विक्रीकर निरीक्षक निलेश पाटील, लक्ष्मी ऍग्रो केमिकलचे संचालक बाळासाहेब सूर्यवंशी व संध्या सूर्यवंशी, श्रीराम समूहाचे श्रीराम पाटील,विशाल इंटेलिजन्स सेक्युरिटी सर्व्हिसेसचे दिनकर चौधरी, दिशा स्पर्धा परीक्षा अकँडमीचे वासुदेव पाटील, उद्योजक विजय देसाई, गोपाल दर्जी, जि. प. सदस्या पल्लवीताई देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. नगर सेवक मयूर कापसे, मामा देशमुख,उत्तम शिंदे, अॅड.एस.एस.पाटील, छावाचे भीमराव मराठे, राम पवार, रवी देशमुख, जळकेकर महाराज, आर बी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते राष्ट्रमाता जिजाऊ मराठा दैवत छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजे प्रतिमेस मानवंदना करण्यात आली प्रास्तविक प्रा.सुनील गरुड यांनी केले.
आयोजकांच्या वतीने विविध संघटनांच्या पदाधिकार्यांनि मान्यवरांचे स्वागत केले १० वीत आणि ,१२ वीत ८०% पेक्षा जास्त गुण मिळवणारी यशस्वी विद्यार्थी पदवी परीक्षेत यशवंत अभियंत्रणकीतील पदवीदर तसेच विशेष प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंसह यशस्वी उद्योजक जितेंद्र चव्हाण (शिव समर्थ मार्केटिंग) ज्ञानेश्वर पाटील (गणपती अॅड जाहिरात एजन्सी); अभय शिंदे; किशोर पाटील (शिवा सर्व्हिसेस); शिक्षक वर्गातून प्रवीण पाटील, डी ए पाटील,आर. के. पाटील, हरीश शेळके, किशोर पाटील-कुंझरकर आदींना सन्मानित करण्यात आले. तर कामगार कल्याण अधिकारी मिलिंद पाटील, विक्रीकर निरिक्षक निलेश पाटील, अमृत पाटील, लिना पाटील, योगाचार्य वासुदेव पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सकल मराठा समाज तसेच, प्रवीण पाटील, आकाश साळुंखे. स्वप्नील बोरसे मितेश चव्हाण, केतन पाटील, किरण पाटील, खेमचंद पाटील, रोहित चव्हाण, अजिंक्य देसाई, प्रमोद पाटील, महेश पाटील, योगेश पाटील व कृष्णा पाटील आदींनी परिश्रम घेतले.