
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आ. चंद्रकांत पाटील यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी मुंबई येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. आपल्या लाडक्या लोकप्रतिनिधीची प्रकृती लवकर सुधारावी आणि त्यांनी पुन्हा त्याच जोमाने जनतेच्या सेवेत रुजू व्हावे, यासाठी मुक्ताईनगर परिसरात प्रार्थनांचे सत्र सुरू झाले आहे.

चांगदेव मंदिरात विशेष अनुष्ठान :
आ. चंद्रकांत पाटील यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी शुक्रवारी ६ मार्च रोजी सकाळी चांगदेव गावातील ऐतिहासिक श्री योगेश्वर चांगदेव महाराज मंदिरात विशेष धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावचे शिवसैनिक, युवा सैनिक, ज्येष्ठ नागरिक आणि समस्त ग्रामस्थांनी एकत्र येत चांगदेव महाराजांना दुग्ध अभिषेक घातला. त्यानंतर भक्तीपूर्ण वातावरणात महापूजा आणि आरती करण्यात आली.
जनतेमध्ये चिंतेचे वातावरण, पण प्रार्थनेतून बळ :
चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या आजारपणाचे वृत्त समजताच मतदारसंघात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, कार्यकर्त्यांनी आणि चाहत्यांनी देवाकडे साकडे घालत त्यांना लवकर बरे करण्याची विनंती केली आहे. “भाऊंनी नेहमीच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न पोटतिडकीने मांडले आहेत, ते लवकरच बरे होऊन आपल्यामध्ये परततील,” असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. या महापूजेच्या प्रसंगी शिवसेना आणि युवा सेनेचे पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. संपूर्ण चांगदेव परिसरात यावेळी ‘भाऊंच्या’ आरोग्यासाठी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.



