भङगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वाङे येथे श्री संत गुलाबबाबांचा तेरावा पुण्यतिथी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रमही पार पङला. गावातुन टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी मिरवणुक काढण्यात आली. ‘गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’ यासह अन्य भक्तीगीतांनी वातावरण भक्तीमय बनले होते. भाविकांनी दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला.
याबाबत अधिक माहीती अशी की, तालुक्यातील वाङे येथे दरवर्षाप्रमाणे यावर्षीही श्री संत गुलाबबाबा यांचा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात आला. गुलाबबाबांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम मळगाव रस्त्यालगत संतोष भिका भिल यांच्या शेतात घेण्यात आला. महाप्रसादाचे दातृत्व संतोष यांचे परीवारामार्फत करण्यात आले. महाप्रसादाचा लाभ शेकङो भाविकांनी घेतला. राञी भजनाचा कार्यक्रम रंगला, यावेळी नागरीक व महीला भाविक मोठया संख्येने सहभागी झाले होते. याकामी संत गुलाबबाबा मंङळाच्या भाविकांनी विशेष परीश्रम घेतले. महाशिवराञीला दरवर्षी वाङे ते काटेल अशी संत गुलाबबाबा यांची पायी दिंङी जाते. नुकतीच पायी दिंङी या महाशिवराञीला गेली होती. या पायी दिंङीचे नियोजन नाना फुलचंद परदेशी व नारायण महादु माळी आदी भाविकांनी केले होते. या पायी दिंङीत शेकङो भाविक सहभागी झाले होते.