साईबाबांच्या शिर्डीत कान्ह ललित कला निर्मित भावयात्राने गुंफले पुष्प

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  श्री साईबाबा संस्थान शिर्डी आयोजित श्री साईसतचरित पारायण सोहळा शिर्डीतील श्री साई समाधी शताब्दी महोत्सव मंडप येथे केसीई सोसायटी चे कान्ह ललित कला केंद्र जळगाव निर्मित ‘भावयात्रा’ या कार्यक्रमाचा ७ वा प्रयोग नुकताच सादर करण्यात आला.

दरवर्षी श्रावण महिन्यात पारंपरिक अशा श्री साई सतचरित पारायण सोहळा निमित्त सात दिवस विविध नामवंत कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.यात जळगावच्या भावयात्रा या कार्यक्रमास संधी देण्यात आली होती.यावेळी भाविक भक्तांनी सदर कार्यक्रम बघुन समधान व्यक्त केले. यावेळी कलाकार संकल्पना लेखन सादरकर्ते शशिकांत वडोदकर, ईशा वडोदकर , कपिल शिंगाने सर, देवेंद्र गुरव , रेडिओ मनभावन ९०.८ एफ एम चे आर जे स्वामी पाटील यांचा श्री साईबाबा संस्थान तर्फे यावेळी श्री साईबाबांची शाल आणि श्रीफळ आणि विभूती देवून  सन्मान करण्यात आला. साईबाबा संस्थानने दिलेली सेवा नक्कीच आशीर्वाद रुपी ठरेल अशी भावना यावेळी कलाकारांनी व्यक्त केली. साईबाबा संस्थानचे कार्यक्रम विभगातील धनंजय मराठे, संगित विभागाचे सुधांशू आणि सहकारी यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

Protected Content