चाळीसगाव प्रतिनिधी । सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावची किल्ले राजदेहरे दुर्गदर्शन मोहीम संपन्न झाली.
सह्याद्री प्रतिष्ठानच्या युवा शिलेदारांनी चाळीसगाव तालुका व नांदगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या राजदेहरे किल्ल्याची दुर्गदर्शन मोहिम पूर्ण केली. यात संपूर्ण किल्ला पाहून मनसोक्त आनंद संपूर्ण टीमने घेतला किल्ल्यावर अनेक पुरातन अवशेष असून सुंदर दगडी पायर्या मोठमोठ्या गुफा पाण्याचे टाके तसेच तटबंदी व बुरुज आजही संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहेत या किल्ल्यावरील एक गुहा जिच्या मध्ये जाण्यासाठी छोटीशी वाट आहे मात्र आत गेल्यानंतर किमान पंचवीस लोक राहू शकतील एवढी मोठी जागा असल्याचे दिसून आले. चाळीसगाव तालुक्याच्या जवळ असलेला हा किल्ला अनेक किल्ले प्रेमींना नेहमीच खुणावत असतो.