धानोरा, ता. चोपडा प्रतिनिधी । मनोधैर्य फाऊंडेशन, जळगाव व सेवा सहयोग फाऊंडेशन पुणे यांचा संयुक्त विद्यमाने यावर्षी सुद्धा शालेय दप्तर व साहित्य वाटप हे करण्यात आले.
कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात हा वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु पी.पी.पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ चे दिलीप पाटील, प्रा. एस.टी. इंगळे, प्रा.अर्चना देगावकर, प्रा.सत्यजित साळवे,डॉ.पंकजकुमार ननावरे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी गरजू व वंचित विद्यार्थ्यांसाठी या किट चे वाटप हे करण्यात आले.
त्यामध्ये जि.प.प्राथमिक शाळा बोदवड, जि. प शाळा जामठी,जि. प शाळा खामखेडा ता. धरणगाव, जि. प शाळा सावरले ता. जामनेर, तसेच विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या पाच गावांमधील जि. प.प्राथमिक शाळा मिळून एकूण ३५० विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व साहित्य वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेरील गरजू विदयार्थी यांना स्कुल किट देण्याचे काम सेवा सहयोग फाऊंडेशनपुणे. गेल्या १० वर्षापासून करत आहे. त्यांच्या सहकार्याने मनोधैर्य फाऊंडेशन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दरम्यान, मनोधैर्य फाऊंडेशन भविष्यात नक्की सहकार्य करेल असे कुलगुरू यांनी सांगितले.
सुत्रसंचालन अनिल सोनवणे यांनी पाहिले तसेच प्रास्तविक अँड.समाधान पवार, आभार प्रदर्शन संस्थेचे कार्यकर्ते समाधान पवार यांनी केले. कार्यक्रमास प्रा.दीपक सोनवणे,अनिल सोनवणे (संस्था अध्यक्ष)संदीप मोरे (संस्था सचिव), रुपाली पाटील, अरविंद माळी, गौरव मोरे, श्रद्धा शुक्ल, अजय भदाणे, सुनिल महाले, करूणा राठोड, आकाश धनगर आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमा साठी परिश्रम घेतले.