Home राज्य अध्यक्षांविनाच पार पडणार साहित्य संमेलन !

अध्यक्षांविनाच पार पडणार साहित्य संमेलन !

0
34

नाशिक प्रतिनिधी | अखील भारतीय मराठी साहित्य संमेलानास आजपासून नाशिक येथे प्रारंभ होत असून यंदा संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर हे उपस्थित राहणार नसल्याने त्यांच्या विनाच हे संमेलन पार पडणार आहे.

आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशिकमध्ये सुरुवात होत आहे. यात संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ जयंत नारळीकर संमेलनाला येणार नसल्याची माहिती मिळाली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव जयंत नारळीकर संमेलनाला येणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. नारळीकरांच्या कुटुंबियांनी प्रकृती आणि आताचे वातावरण या पार्श्‍वभूमीवर संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील प्रकृतीच्या कारणामुळं उपस्थित राहू शकणार नाहीत. ते ऑनलाईन हजेरी लावतील अशी माहिती आहे. माजी संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो देखील प्रकृतीच्या कारणास्तव अनुपस्थित असणार आहेत.


Protected Content

Play sound