अमळनेर प्रतिनिधी । वॉटर कप स्पर्धेसाठी जय्यत तयारी करणार्या अनोरेकरांना माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी ५१ हजारांची मदत जाहीर केली आहे.
सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशन वॉटर स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील आनोरे येथे विविध मान्यवरांनी श्रमदान केले. यात माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनीदेखील सहभाग घेतला. त्यांनी श्रमदान करून या योजनेत सहभाग नोंदविला. दरम्यान, याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, आमदार सौ.स्मिता वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. पुष्पलता साहेबराव पाटील, प्रांताधिकारी,तहसिलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी, बीडीओ, नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी संजय चौधरी, भाजप तालुका सरचिटणीस जिजाब पाटील, शहर सरचिटणीस उमेश वाल्हे, फाफोरे सरपंच जितेंद्र पाटील,रवि पाटील हेडावे, ज्ञानेश्वर पाटील, दिपक पाटील, कमलेश आर्य आदींसह नगरपालिका व महसुल खात्याचे सर्व कर्मचारी बांधव व भगिनी,ग्रामस्थ त्यांचा संपुर्ण टीम सोबत महाश्रमदानात सहभागी झाले होते. श्रमदान करणार्यांना शुध्द व थंड पाणी प्यायला मिळावे यासाठी अमळनेर नगरपरिषदेने जिवनधारा गाडीची सोय केली होती. याप्रसंगी आनोरे गावाच्या उपक्रमास आर्थिक मदत म्हणुन मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी ५१ हजार रुपयांची मदत जाहीर केली.