जळगाव (प्रतिनिधी) साहेबांचा आदेश आहे,त्यामुळे आता सर्वाना कामाला लागावे लागेल, मी देखील उमेदवार म्हणून उद्यापासून मतदार संघाचा दौरा असून उद्या चाळीसगावात सभा घेणार असल्याचे आज जळगाव मतदार संघातील उमेदवार गुलाबराव देवकर यांनी सांगितले. ते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रावादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या आयोजित मेळाव्यात बोलत होते.
लोकसभ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रावादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा जिल्हा मेळावा आज दुपारी येथील जिल्हा कार्यालयात पार पडला. या मेळाव्याकडे सगळ्या राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून होते. या मेळाव्यात रा.कॉ. चे जळगाव मतदार संघातील उमेदवार गुलाबराव देवकर यांनी कार्यकर्त्यांना प्रचार कार्याला लागण्याचे आवाहन केले. ते स्वत: उद्यापासून (दि.२३) जिल्ह्यात प्रचारदौरा करणार असून २ मार्चपर्यंत मतदार संघातील सगळ्या तालुक्यात सभा घेणार आहेत. उद्या चाळीसगावातून ते दौऱ्यांना सुरुवात करणार आहेत. यावेळी रा.कॉ.चे खजिनदार व माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी म्हटले की, आमच्याकडे लोकसभेसाठी उमेदवार नाही अशी टीका विरोधक करीत होते, आता मात्र त्यांचा उमेदवार मिळणे कठीण झाले आहे. त्याची जोरात शोधाशोध सुरु आहे. आमचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना माझे पूर्ण समर्थन आहे. मेळाव्याला संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी माजी खा. वसंतराव मोरे, माजी खा. ईश्वर बाबूजी जैन, जळगाव लोकसभेचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर ,जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, हाजी गफ्फार मलिक, कार्याध्यक्ष विलास पाटील, माजी आमदार अरुणदादा पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष नामदेवराव चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष ललीत बागुल, महिला जिल्हाध्यक्षा कल्पनाताई पाटील, मंगलाताई पाटील, शहराध्यक्षा निलाताई,महानंदाचे संचालक प्रमोद पाटील , जि.प.गटनेते शशिभाऊ साळुंखे, युवक महानगराध्यक्ष आभिषेक पाटील, युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील यांच्यासह सर्वच विधानसभाक्षेत्र प्रमुख , तालूकाध्यक्ष , जि.प. व प.स. सदस्य , नगरसेवक , सर्वच फ्रंटचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थितीत होते.
पहा– राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याचा हा व्हिडीओ.