Home Cities जळगाव प्रभाग क्रमांक २ अ मधून सागर सोनवणे यांची बिनविरोध निवड !

प्रभाग क्रमांक २ अ मधून सागर सोनवणे यांची बिनविरोध निवड !

0
412


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २-अ मधून शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार सागर शाम सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. अपक्ष उमेदवार अश्विन साहेबराव सैंदाणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सागर सोनवणे यांची निवड निश्चित झाली.

निवड जाहीर होताच प्रभागात समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. परिसरात आनंदाचे वातावरण पसरले होते.

प्रसारमाध्यमांशी बोलताना सागर सोनवणे यांनी सांगितले की, प्रभागात यापूर्वी अनेक विकासकामे करण्यात आली असून उर्वरित प्रलंबित कामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. नागरिकांच्या अपेक्षांवर खरे उतरून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा आपला संकल्प असल्याचेही त्यांनी नमूद केले.


Protected Content

Play sound