Home Cities जळगाव गणपती नगरमध्ये भगवे वादळ! महायुतीचा घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद

गणपती नगरमध्ये भगवे वादळ! महायुतीचा घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद

0
103


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता निर्णायक वळणावर आली आहे. प्रचारासाठी आता अवघे तीन दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवारांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीच्या उमेदवारांनी रविवारी सुटीचा दिवस साधत झंझावाती प्रचार दौरा केला, ज्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

शक्तीप्रदर्शनाने वेधले लक्ष :
रविवारी ११ जानेवारी रोजी सकाळी प्रभाग १३ मधील महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रफुल्ल गुलाबराव देवकर, नितीन सपके आणि सुरेखा तायडे यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीची सुरुवात रोटरी हॉल परिसरापासून झाली. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. हातात महायुतीचे ध्वज आणि विजयाच्या घोषणा देत निघालेल्या या रॅलीने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

घरोघरी जाऊन साधला संवाद :
ही रॅली रोटरी हॉल, गणपती नगर आणि क्रेझी होम यांसह प्रभागातील विविध मुख्य वसाहतींमधून फिरली. यावेळी उमेदवारांनी केवळ रॅली न काढता प्रत्यक्ष मतदारांच्या दारात जाऊन संवाद साधण्यावर भर दिला. “प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीला साथ द्या,” असे आवाहन प्रफुल्ल देवकर आणि सहकारी उमेदवारांनी यावेळी केले. ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेत आणि तरुणांशी चर्चा करत उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.

कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा :
या प्रचार दौऱ्यात महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. प्रचाराचे शेवटचे काही तास शिल्लक असल्याने आता कोपरा सभा आणि वैयक्तिक गाठीभेटींवर उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे. प्रभाग १३ मधील हा वाढता पाठिंबा पाहता, महायुतीने निवडणुकीत आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.


Protected Content

Play sound