मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | १०० कोटींच्या वसुली प्रकरणात बडतर्फे पोलीस अधिकारी सचिन वाझे हा माफीचा साक्षीदार बनण्यासाठी तयार झाला असून यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे. सचिन वाझेंनी आरोपींविरोधात आपल्याकडे असणारी सर्व माहिती देण्याची तयारी दर्शवली असून यामध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही समावेश आहे.
सीबीआयने माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेंनी केलेला अर्ज मान्य केला आहे. सचिन वाझेंना माफीचा साक्षीदार होण्यासाठी सर्व तरतुदी तसंच कायदेशीर अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत.
कोर्टाने सचिन वाझेंची याचिका स्वीकारल्यास त्यांची साक्ष फिर्यादी साक्षीदार म्हणून नोंदवली जाईल. तसंच पुरावे इतर आरोपींविरुद्ध वापरले जाऊ शकतात. यानंतर सचिन वाझेंना खटल्याला सामोरं जावे लागणार नाही. सचिन वाझेंनी सक्तवसुली संचालनाकडेही अशीच विनंती केली होती. ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लॉंड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लॉंड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.