जळगाव-शिरसोली रस्त्यावर दोन मित्रांना लुटले; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते शिरसोली रस्त्यावरील असलेल्या कृष्ण लॉननजीक दोन तरूणांचा रस्ता आडवून दोन भामट्यांनी जबरी मोबाईल आणि गळ्यातील चांदीची चैन असा एकुण १७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल घेवून पसार झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत बुधवारी २९ मार्च रोजी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अभिषेक जगन्नाथ निंभोरे (वय-२४, रा. किसनराव नगर जळगाव) हा त्याचा मित्र साहिल कासार यांच्यासोबत मंगळवारी २८ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास दुचाकीने रायसोनी कॉलेज येथून जळगाव येत असतांना जळगाव- शिरसोली रस्त्यावरील कृष्णा लॉन्स जवळ अज्ञात दोन भामट्यांनी दोघांची दुचाकी आडवून रस्ता आडविला. अभिषेक निंभोरे आणि साहिल कासार यांनी दुचाकी थांबविली असता अज्ञात दोघांना दमदाटी करून १५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल आणि २ हजार रूपये किंमतीची चांदीची चैन असा एकुण १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना घडली आहे. अभिषेक निंभोरे याने बुधवारी २९ मार्च रोजी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे करीत आहे.

Protected Content