मुंबई । शेतकर्यांना दहशतवादी म्हणणारी भाजपची ‘झांसे की रानी’ शेफारली असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केली आहे.
सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा
गेल्या अनेक दिवसांपासून आपली वक्तव्ये आणि ट्विटसमुळे अभिनेत्री कंगना राणावत ही वादाच्या भोवर्यात सापडली आहे. काल तर तिने कहर करत शेतकर्यांची तुलना थेट दहशतवाद्यांशी केली. कंगनाने ट्विट करत म्हटले की, ”पंतप्रधान मोदी जी, जे झोपले आहे त्यांना जागे करता येईल, ज्यांचा गैरसमज झाला आहे त्यांची समजूत काढता येईल मात्र, जे झोपेचं सोंग करत आहेत, काहीच समजत नाही असा आव आणत आहेत, त्यांना तुम्ही कितीही समजावून सांगितलं तरी काय फरक पडणार आहे, असा सवाल कंगनाने उपस्थित केला आहे. तसेच हे तेच दहशतवादी आहेत ज्यांनी सीएएला विरोध केला होता. सीएएविरुद्ध आंदोलन करून रक्ताचे पाट वाहिले होते, प्रत्यक्षात मात्र एकाही व्यक्तीचं नागरिकत्व या कायद्याने हिरावलं गेलं नाही”, असं कंगनाने म्हटले आहे. कंगनाच्या या विधानावरुन तिच्यावर प्रखर टीका होत आहे. या पार्श्वभूमिवर, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी तिच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये सचिन सावंत म्हणाले की, ”आता कंगना शेतकर्यांना आतंकवादी म्हणाली. मोदी सरकार व राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी सर्व शेतकर्यांची माफी मागितली पाहिजे. मोदी सरकारने दिलेल्या वाय श्रेणी सुरक्षा व पाठिंब्यामुळे भाजपाची ही झांसे की राणी इतकी शेफारली आहे. आम्ही भाजपा व कंगना या दोघांचा जाहीर निषेध करत आहोत”, असं सचिन सावंत यांनी यात म्हटले आहे.