पाचोरा प्रतिनिधी । ‘बबल्या इकस केसावर फुगे, या सुपरहिट गाण्यामुळे तुफान लोकप्रिय झालेले अभिनेते सचिन कुमावत यांचा येथील विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये सत्कार करण्यात आला.
येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये व मनी माय बबल्या ईकस केसांवर फुगे या गाण्याने अवघा महाराष्ट्रात धमाल उडवणारे गाण्याचे दिग्दर्शक व अभिनेते सचिन कुमावत यांनी भेट दिली. त्यांनी विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची संपूर्ण पाहणी करून रूग्णांची भेट घेतली. या वेळी अभिनेते सचिन कुमावत यांनी हॉस्पिटल बाबत बोलतांना सांगितले की उत्तर महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात व पाचोरा सारख्या तालुक्याच्या ठिकाणी १२० खाटांनी आरोग्य सुविधेसाठी सज्ज असलेल्या गोर – गरिब रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार्या डॉ भुषण मगर, डॉ. सागर गरुड, डॉ. प्रिती मगर, यांनी अतिशय कमी कालावधीत घेतलेली भरारी स्तुत्य आहे. विशेष बाब म्हणजे सर्वसामान्य रुग्णांसाठी महात्मा जोतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना उपलब्ध करून दिली असून याचा गरजूंचा लाभ होत असल्याबद्दल त्यांनी कौतुकाचे उदगार काढले.
याप्रसंगी सचिन कुमावत यांचा विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भूषण मगर व डॉ. सागर गरुड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. विश्वास रोटे, डॉ. प्रवीण देशमुख, डॉ. संदीप इंगळे, डॉ. अंबिका घोष व स्वराज्य फाऊंडेशनचे लकी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.