रावेर येथे निलंबित केलेल्या एस.टी. कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

रावेर प्रतिनिधी । एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याच्या तणावावरुन डेपोतच ड्रायव्हरने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तात्काळ त्यांना रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्याने तब्बेत चांगली असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रावेर येथील एसटी ड्रायव्हर राहुल विश्वनाथ कोळी (वय 35) असे विषारी औषध घेतल्याने व्यक्तीचे नाव आहे. कोळी यांनी आज दि. ९ डिसेंबर रोजी दुपारी १ ते १:३० वाजेच्या दरम्यान डेपो मध्येच अचानक खाली कोसळल्याने त्यांना एस.टी. डेपो मॅनेजर जी.पि.जंजाळ व एस.टी कर्मचारी कंडक्टर आणि ड्रायव्हर यांनी तात्काळ बसमध्ये टाकून रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर रावेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी तात्काळ उपचार केल्याने त्यांची तब्बेत आता चांगली आहे. रावेर डेपोतील ड्रायव्हर नामे राहुल कोळी हे रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील रहिवासी असून त्यांना काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाकडून निलंबित केल्याचे पत्र मिळाल्याने त्या नैराश्यामुळे त्यांनी आज विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला .

 

 

 

Protected Content