चेन्नई वृत्तसंस्था । ख्यानाम पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे उपचार सुरू असतांना आज दुपारी एक वाजता निधन झाले आहे. त्यांच्या रूपाने गायनातील एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे.
प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी वयाच्या ७४ वर्षी अखेरचा श्वास घेतला. अलीकडेच बालासुब्रमण्यम यांनी करोनावर मात केली होती. मात्र त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांचे पुत्र एसपी चरण यांनी आज याबाबत माहिती दिली.
बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एस. पी. बालसुब्रमण्यम यांना आवाजाचा जादूगार म्हटलं जायचं. त्यांनी जवळपास ४० हजार गाण्यांना आपला आवाज दिला आहे.