ग्रामीण पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी पाटील

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील पाडळसरे येथील दिव्य मराठीचे प्रतिनिधी वसंतराव पाटील यांची अ.भा. ग्रामीण पत्रकार संघाच्या उत्तमर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

तवसा तालुक्यातील कुर्‍हा येथे झालेल्या अ.भा. ग्रामीण पत्रकार संघटनेच्या केंद्रीय व प्रदेश कार्यकारिणीच्या महत्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला. यावेळी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने, केंद्रीय महासचिव सुरेश सवळे, प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख,मानद सचिव अशोक पवार, संघटक राजेंद्र भुरे, उपाध्यक्ष युसूफ खान, जिल्हाध्यक्ष प्रा.रवींद्र मेंढे आदींची उपस्थिती होती.

यावेळी राज्यातील नऊ जिल्हाध्यक्ष व दोन विदर्भ व उत्तर महाराष्ट्र अध्यक्षांची निवड सर्वानुमते करण्यात आली.यात विदर्भ अध्यक्ष संजय कदम,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष वसंतराव पाटील तसेच अमरावती जिल्हाध्यक्षपदी प्रा.रवींद्र मेंढे, बुलढाणा-योगेश हजारे, जळगाव (खान्देश)-भगवान सोनार, धुळे-सुनिल चौधरी, अहमदनगर-बाळासाहेब जाधव, हिंगोली-गोपाळ सरनायक, नांदेड मकरंद पांगरकर, परभणी-अनवर लिंबीकर, मुंबई-यामीनी लोहार, यांच्या नियुक्ता करण्यात आल्या.

पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचे नुतनीकरण करून त्यांच्या कडून सभासदांचा अर्ज भरून तसेच केंद्रीय कार्यकारिणी ने ठरविलेले सदस्यत्व शुल्क वसुल केल्या शिवाय सदस्यता व पद कायम केल्या जाणार नाही असा ठराव घेण्यात आला.या प्रक्रियेची नोंद ऑन लाईन होणार असून त्याच वेळी सदस्यांना ऑन लाईन ओळख पत्र देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Add Comment

Protected Content