Home राजकीय काँग्रेसमध्ये आनंदराज आंबेडकरांचा प्रवेशाची अफवा

काँग्रेसमध्ये आनंदराज आंबेडकरांचा प्रवेशाची अफवा


Anandraj Ambedkar

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी नुकताच दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त अफवा निघाली आहे.

 

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या उपस्थितीत आनंदराज यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची अफवा होती. एवढेच नव्हे तर, दिल्लीतील त्यांच्या पक्षाचे सातही लोकसभा मतदारसंघातले उमेदवार मागे घेत असल्याची घोषणाही आंबेडकर यांनी केल्याचे खोडसाळ वृत्त प्रसारित करण्यात आले होते. आनंदराज यांच्यासह अनेकांनी केलेल्या पक्ष प्रवेशामुळे दिल्लीत काँग्रेसची ताकद वाढली असल्याचे शीला दीक्षित यांनी तर केवळ काँग्रेस पक्षच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण शकतो, असे आनंदराज यांनी पक्ष प्रवेशानंतर म्हटले असल्याची अफवा देखील उडविण्यात आली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound