मुंबई प्रतिनिधी । आगामी शिवजयंतीच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने नियमावली जाहीर केली असून हा महोत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले आहे.
शिवजयंती तोंडावर आल्याने गृह विभागाने परिपत्रक जारी करुन शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात शिवजयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात येतात. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन असे कार्यक्रम आयोजकांनी रद्द करावे, असे आदेश गृह विभागाकडून देण्यात आले आहेत.
खालीलप्रमाणे नियम घालून देण्यात आले आहेत.
१ केवळ १० व्यक्तींच्या उपस्थितीच शिवजयंती साजरी करावी
२ बाईक रॅली किंवा मिरवणूक काढू नये
३ गर्दी न करता साधेपणाने शिवजयंती साजरी करावी.
४ मिरवणूक, सादरीकरण किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये
4. आरोग्य उपक्रम तसेच शिबीर जनजागृती करावी
5. सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेविषयक नियमांचे पालन करावे
6. स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
७ मिरवणुकीला परवानगी नाही