शिवजयंती साजरी करण्यासाठी नियमावली जाहीर

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शिवजयंती महोत्सवात शिवज्योती दौडीत २०० जण तर जन्मोत्सव सोहळ्यात ५०० जणांना उपस्थित राहता येणार आहे. अश्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.

शिवजयंती महोत्सवात कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

राज्यासह देशात १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यावेळी शनिवारी शिवजयंती असल्यानेगृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत २०० जणांना सहभागी होता येईल. तसेच शिव जन्मोत्सव सोहळ्यात ५०० जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.

 

Protected Content