जळगाव प्रतिनिधी । येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेतर संवर्गातील दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी एमएच 19/ डीके-0001 ते 9999 पर्यंतची मालिका 29 एप्रिल, 2019 पासून सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्यांनी 25 व 26 एप्रिल रोजी दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज करावा. त्यासोबत शासकीय शुल्काचा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या नावे असलेला धनादेश, ओळखपत्र जमा करावे. त्यानंतर आपल्या पसंतीचा क्रमांक प्राप्त करुन घ्यावा. तसेच अशा आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यावर वाहनाचे कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. ही मालिका चालू असतांना वाहन- 4 प्रणाली कार्यान्वयीत झाल्यानंतर बंद करण्यात येईल. एकापेक्षा जास्त अर्ज असलेल्या क्रमांकाबाबत 28 एप्रिल रोजी वाढीव शुल्काचा धनाकर्ष सायंकाळी चार वाजेपर्यंत जमा करणे आवश्यक राहील. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी कळविले आहे.
दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांक मालिका
6 years ago
No Comments