रावेर, प्रतिनिधी | दुय्यम रेशन कार्ड संदर्भात येथील तहसिल कार्यालयात नागरिकांच्या तक्रारी वाढत आहे. येथील अव्वल कारकुन सतत गायब राहत असल्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सुर उमटत आहे.
याबाबत वृत्त असे की, येथील पुरवठा विभागात तालुका भरातून जीर्ण रेशन कार्ड नविन करण्यासाठी नागरीक येतात. परंतु, येथील अव्वल कारकुन सतत आपल्या जागेवर उपलब्ध नसतात. यासोबतच नागरिकांची तक्रार आहे की, त्यांना दुय्यम रेशन कार्ड देण्यासाठी फिरवा-फिरव केली जात आहे. खेड्यागावातून कामधंदा सोडून गरीब ग्रामस्थ पुरवठा विभागात येत असतात. मात्र, त्यांना अव्वल कारकून भेटत नसल्याने पुन्हा माघारी फिरावे लागत आहे. यातून त्यांना जाण्या येण्याचा आर्थिक बोझा सहन करावा लागत आहे. याकडे तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.