जळगाव प्रतिनिधी । रोटरी क्लब जळगाव वेस्ट, इंडियन रेडक्रॉस सोसायटी व रोटरी क्लब कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम पाय व कॅलिपर्स वाटप करण्यात आले.
मायादेवीनगर येथील रोटरी भवनात आयोजित या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी गाडीलकर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी क्लबचे अध्यक्ष चंद्रकांत बागरेचा (कल्याण), मानद सचिव डॉ. राजेंद्र कोंबे, रोटरी वेस्टचे डॉ. आनंद दशपुत्रे, रोटरी क्लब कल्याणचे किरण पाटील व रेडक्रॉसचे अनिल कांकरिया यांच्यासह जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राचे सोपान गणेशकर यांनी सहकार्य केले. या वेळी रोटरी वेस्ट अध्यक्षा संगीता पाटील, मानद सचिव राजेश परदेशी, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, सचिव विनोद बियाणी, रोटरी क्लबचे नामदेव चौधरी (कल्याण), अरुण सपकाळे, रोटरी वेस्टचे योगेश भोळे, सुनील सुखवाणी, चंद्रकांत सतरा, समकीत मुथा आदी उपस्थित होते. जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राच्या सहभागाने झालेल्या या कार्यक्रमात नोंदणी शिबिरात मोजमाप झालेल्या सर्व दिव्यांग व्यक्तींना हे कृत्रिम पाय व कॅलीपर्स बसवण्यात आले.