चाळीसगाव प्रतिनिधी । रोटरी क्लब ऑफ चाळीसगावतर्फे दि. 26 जुलै शुक्रवार रोजी ‘व्हिजन नेक्स्ट, स्वप्न नव्या भविष्याचे’ या प्रकल्पांतर्गत तालुक्यातील विविध शाळेमधून 5 विद्यार्थी असे 50 विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले.
यात औरंगाबाद येथील नामांकित शासकीय शिक्षण संस्था व प्लास्टिक कंपनी ‘सिपेट’, तसेच ‘इंडो जर्मन टूल रूम’ यांची सखोल माहिती तसेच संपूर्ण Production युनिट आणि वर्कशॉप दाखवण्यात आले. यामध्ये इंडो-जर्मन टूल्सचे कार्यकारी अधिकारी जयेश बागुल यांनी रोजगाराच्या विविध संधीवर मार्गदर्शन करत प्रकाश झोत टाकली आहे. त्यानंतर औरंगाबाद एअरपोर्ट येथे भेट देण्यात आली. यात विमानाचे टेक-ऑफ, लँडिंग, एअरट्रॅफिक कंट्रोल युनिट तसेच विमान उडवण्यासाठीची आणि विमानतळावरची संपूर्ण यंत्रणाबद्दल माहिती देत यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचे एअरपोर्ट प्रमुख अधिकारी शरद येवले यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ चाळीसगावचे अध्यक्ष डॉ. संदीप देशमुख, सचिव रोटे.रोशन तातेड, प्रकल्पप्रमुख रोटे. मधुकर कासार, तसेच रोटे.मनीष शहा, रोटे. रविंद्र निकम, रोटे.अभिषेक देशमुख यांनी योगदान दिले आहे.