Home Cities जळगाव जळगावात रोटरी क्लबतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण 

जळगावात रोटरी क्लबतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण 

rotary club
rotary club

rotary club

जळगाव प्रतिनिधी । येथील रोटरी क्लब जळगावतर्फे शकुंतला माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. अध्यक्ष कॅप्टन मोहन कुळकर्णी, माजी प्राचार्या डॉ. मंगला जंगले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रोटरीचे माजी अध्यक्ष छबीलदास शहा यांनी सर्व शैक्षणिक साहित्य पुरस्कृत केले.

यावेळी मानद सचिव संदीप शर्मा, माजी अध्यक्ष डॉ.जयंत जहागिरदार, डॉ. तुषार फिरके, प्रकल्पप्रमुख जितेंद्र ढाके, प्रा.डॉ.शुभदा कुळकर्णी, प्रभाकर जंगले, डॉ. काजल फिरके, राकेश चव्हाण, सुभाष अमळनेरकर, मुख्याध्यापक राजश्री महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound