रोटरी ईस्टचा ‘जळगाव पॅटर्न’ सर्वांसाठी आदर्श ठरणार – डिजी रमेश मेहर

 

जळगाव प्रतिनिधी | रोटरी क्लब सेवाभावमुळे गरजूसाठी आशेचा किरण ठरत आहे. शहरातील रोटरी क्लबचे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य लक्षात घेता रोटरीचा ‘जळगाव पॅटर्न’ सर्वत्र आदर्श ठरेल, असा विश्वास डीजी रमेश मेहर (नाशिक) यांनी व्यक्त केला.

रोटरी क्लब जळगाव ईस्टच्या ऑफिसियल क्लब व्हिजिटनिमित रमेश मेहर यांच्या मुख्य उपस्थितीत गणपतीनगरमधील रोटरी हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या कार्याचा परिचय असिस्टंट गव्हर्नर विष्णू भंगाळे यांनी करून दिला. या क्लबचे हे सिल्वर जुबली इयर असल्याने विशेष कार्यक्रमांची माहिती देण्यात आली.

या क्लबतर्फे आतापर्यंत राबविलेल्या विविध उपक्रम व घेतलेल्या कार्यक्रमांची माहिती आणि आगामी कालावधीचे नियोजन क्लबचे अध्यक्ष सीए वीरेंद्र छाजेड यांनी सांगितले. क्लबचे सचिव प्रणव मेहता यांनी विविध सामाजिक, लोकोपयोगी, विद्यार्थी हितांच्या कार्याची माहिती दिली.

क्लबतर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला, पूजा की थाली, फुलांच्या रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. चित्रकला स्पर्धेत प्रथम क्र. पूर्वा साखला, दुसरा क्र. धनश्री जाधव, तृतीय क्र. हेमांगी गणंत्रा, पूजा की थाळी स्पर्धेत प्रथम क्र. वनिता सोनी, द्वतिय क्र. रजनी पहरिया, तृतीय क्र. अर्चना मेघणानी, तर फुलांच्या रांगोळी स्पर्धेत प्रथम क्र. धनश्री जाधव, दवतिय क्रमांक विधी आणि उन्नती लुंकड, तृतीय क्रमांक शौर्य मेहता व पलक शहा यांनी प्राप्त केला आहे. त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. धनश्री मेहता हिने गणेश वंदना, तर स्वागत नृत्य आशि अग्रवाल

हिने सादर केली. नूतन सदस्य मयूर ओस्त वालयांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ.राहुल भन्साळी यांनी केले. तर आभार संग्रामसिंह सूर्यवंशी यांनी केले.

या वेळी फस्ट लेडी ऑफ क्लब प्रियांका छाजेड, मोनिका मेहता, असिस्टंट गव्हर्नर संगीता पाटील, महेंद्र अग्रवाल, राजेश साखला, पूजा अग्रवाल, निता परमार, बबिता मंधांन, प्रणाली साखला, प्राजक्ता वैद्य, वर्धमान भंडारी, प्रीती चोरडिया, विनोद पाटील-भोईटे, डॉ.जगमोहन छाबडा, डॉ.अमेय कोतकर, अमरनाथ चौधरी, हेमंत छाजेड, अभय कांकरिया, रवी कांकरिया, संजय गांधी, संजय शहा आदी उपस्थित होते.

Protected Content