जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गोदावरी इन्स्ट्यिूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च एमबीए आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी यांच्या संयुक्त विद्यामानाने गरजू लोकांना जुने कपडे वाटप करण्यात आला.
यावेळी शहरातील कालिंका माता मंदीर परिसरात राहत असलेल्या गरजू लोकांना मायेची उब मिळावी यासाठी शहरातील गोदावरी इन्स्ट्यिूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च एमबीए आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी यांच्या संयुक्त विद्यामानाने जुने कपडे वाटप करण्यात आले. याप्रसंगी गोदावरी महाविद्यालयातील एमबीए, बीबीए आणि बीसीएच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाबाबत महाविद्यालयाचे संचालक डॉ.प्रशांत वारके व रोट्रॅक्ट क्लब ऑफ गोदावरीच्या समन्वयक प्रा. भाग्यश्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.